अल्पवयीन मुलीवर एका रात्रीत तीन ठिकाणी सामूहिक बलात्कार

 

मुंबई : वृत्तसंस्था ।  अल्पवयीन मुलीवर इन्स्टाग्रामवर भेटलेल्या ६  मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

 

‘इन्स्टा’वरील मित्रांनी वाढदिवसांच्या निमित्ताने बोलावून घेतलं आणि सहा जणांनी तिच्या मुंबईतील तीन वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

 

३१ मे आणि १ जूनच्या रात्रीत ही घटना घडली  १६ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी मालाड वेस्ट पोलीस ठाण्यात दिली होती. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत  तपास सुरू केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी अचानक मुलगी स्वतःच घरी परत आली.

 

दुपारच्या वेळी मुलगी घरी आली, तेव्हा ती खूप घाबरलेली होती. तिला अशक्तपणाही आला होता. तिच्या आईवडिलांनी रात्रभर कुठे होती, याबद्दल विचारणा केली. मात्र, तिनेही काहीही सांगितलं नाही. त्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्यांचं एक पथक मुलीच्या घरी गेलं. त्यांनी तिची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. सुरूवातीला मुलीने टाळाटाळ केली. थोड्या वेळाने सगळी आपबीती पोलिसांना सांगितली. ते ऐकून पोलिसही हादरले.

 

इन्स्टाग्रामवर मुलीचे काही जण मित्र बनले होते. त्यातीलच एका मित्राचा वाढदिवस होता. त्यामुळे त्यांनी पार्टी ठेवली होती. ३१ मे रोजी रात्री सर्वजण मढ येथील एका हॉटेल बाहेर भेटले. त्यांनी गाडीवरच केक कापून सेलिब्रेशन केलं. त्याचवेळी तिचे दोन मित्र तिला कारमध्ये घेऊन गेले. दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी मालाड भागातील दुसऱ्या मित्राच्या घरी तिला सोडलं. तिथेही तिच्यावर मित्रांनी बलात्कार केला. त्यानंतर मुलगी आपल्या दुसऱ्या मित्राच्या घरी गेली. पण दुर्दैवाने तिथेही तिच्या बलात्कार करण्यात आला.

 

मुलीने माहिती दिल्यानंतर पोलिासांनी पोक्सो कायद्यातंर्गत सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर सहा जणांना अटक करण्यात आली. सर्व आरोपी १८ ते २३ या वयोगटातील असून, त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. सर्व आरोपी पोलीस कोठडीत असून, पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.