अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जामनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील गारखेडा येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला कपडे घेवून देतो असे सांगून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील गारखेडा येथे १४ वर्षीय मुलगी आपल्या आईवडीलांसह वास्तव्याला आहे. राजेश रामाराम जाधव रा. लोंढे ता.चाळीसगाव जि.जळगाव याने १४ वर्षीय मुलीला भुसावळ येथे जावून कपडे घेवून देतो असे सांगून मुलीला बुधवार २७ जुलै रोजी सोबत घेवून गेला. त्यानंतर मुलगी घरी आलीच नाही. मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोधकेली परंतू मुलगी कुठेही आढळून आली नाही. अखेर गुरूवारी २८ जुलै रोजी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी राजेश जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र बिऱ्हाडे करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.