अल्पवयीन मुलीचा विनयभंग; संशयित अटकेत!

यावल , प्रतिनिधी | तालुक्यातील साकळी येथील बारा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयिताला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील साकळी येथील रहिवासी व मुळ मध्य प्रदेशात राहणाऱ्या आदिवासी मजूर कुटुंबियातील बारा वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याची घटना आज दुपारी उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी संशयीत आरोपी सखाराम उर्फ अक्रम मानसिंग भिलाला (रा. वराडसीम, ता. भुसावळ) अटक करून त्यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पिडीत मुलीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. दरम्यान फिर्यादीत माझी बारा वर्षीय अल्पवयीन बहीण तिच्या बहिणी सोबत शेतात गेलेली असताना. त्याठिकाणी सखाराम उर्फ अक्रम मानसिंग भिलाला याने माझ्या बहिणीस शेतात ओढत कपाशीच्या शेतात नेऊन विनयभंग केला. याप्रकरणी पिडीतेच्या भावाने पोलिस स्थानकात सखाराम उर्फ अक्रम भिलाला यांच्या विरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलिसांनी संशयित आरोपीला सखाराम भिलाला यास अटक केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले करीत आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!