अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रामानंदनगर पोलिसात एकावर गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील संभाजीनगर परिसरातील एका भागात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करून तिला मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत मंगळवार २२ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता एकावर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोळा वर्षीय ही अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह संभाजीनगर परिसरातील एका भागात वास्तव्याला आहे. 10 नोव्हेंबर सकाळी 10 ते 22 नोव्हेंबर रात्री 8 वाजता दरम्यान संशयित आरोपी बबल्या कोळी याने अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिचा हात पकडून तिचा विनयभंग केला. तिने विरोध केला असता, तिला चापटा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार अल्पवयीन मुलीले आपल्या घरच्यांना सांगितल्यानंतर त्यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी बबल्या कोळी याच्या विरोधात मंगळवार 22 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content