जळगाव प्रतिनिधी । अर्नब गोस्वामी विरोधात कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष ॲड. संदीपभैय्या पाटील यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्याचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी आणि वार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉटसॲप चॅटमधून मधुन अनेक गंभीर बाबी उघड झालेल्या आहेत. संपादक अर्नब गोस्वामी याने देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची, गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामीला मोदी सरकारमधील मोठ्या व्यक्तीकडून मिळते असे सांगत ती राष्ट्रीय संरक्षण विषयक महत्वाची माहिती रिपव्लिक टीव्हीवर सार्वजनिक करून स्वत:चा व्यावसायिक फायदा करून घेतला. देशाच्या संरक्षण व लष्करी माहितीचा वापर करणे हा देशद्रोहाचा प्रकार आहे. मोदी सरकारमधील तो मोठी व्यक्ती आणि अर्नव गोस्वामी यांच्या या देशद्रोही प्रकाराची चौकशी करून त्यांना अटक करावी. या मागणासाठी आज २२ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीपभैय्या पाटील, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, प्रदेश सरचिटणीस डी.जी.पाटील यांच्यासह काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
https://www.facebook.com/508992935887325/videos/247291050121347