नवी दिल्ली : वृत्तसंस्था । दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांनी पुन्हा एल्गार पुकारत अर्थसंकल्पादिवशी शेतकऱ्यांचा १ फेब्रुवारीला संसदेवर मोर्चा काढण्याचा इशारा आज दिला आहे
आंदोलक शेतकऱ्यांच्या या इशाऱ्यामुळे आता शेतकरी संघटना आणखी आक्रमक झाल्याचे आज स्पष्ट झाले त्यामुळे मोदी सरकारची नाचक्की सुरूच आहे
राजधानी दिल्लीत आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रचंड धुमश्चक्री पाहायला मिळाली. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर कूच केली होती. शेतकरी पोलीस झटापटीत ३०० पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे. तर दिल्ली पोलिसांकडून २२ एफआयर दाखल करण्यात आल्या आहेत. सिंघू बॉर्डर आणि लाल किल्ल्यावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
आता दिल्ली पोलीस आयुक्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत
कोई पंधेर, पन्नू आणि दीप सिद्धू या तीन लोकांना पंजाबच्या शेतकऱ्यांनी निर्देशित केलं आहे. त्यांनी कालची घटना घडवली. त्यांना मोठ्या प्रमाणात फंडिंग झालं आहे. ते लोक शेतकरी आंदोलानाला उद्धवस्त करु पाहत आहेत. सरकारनं अशा लोकांना तुरुंगात टाकलं पाहिजे, असं काँगेस नेते रवनीत सिंह बिट्टू म्हणाले आहेत.
दोन महिन्यांपासून एका समुदायाविरोधात षडयंत्र रचले गेले आहे , हे शीख समुदायाचं आंदोलन नसून शेतकऱ्यांचं आंदोलन असे दिल्लीतील शेतकरी आंदोलकांच्या नेत्यांपैकी प्रमुख नेते असलेले राकेश टिकैत म्हणाले आहेत
“लाल किल्ल्यावर ज्यांनी झेंडे फडकावले त्यांना शिक्षा मिळणार आहे.असेही ते म्हणाले
नवी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसाचारमध्ये ३०० पोलीस जखमी झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. . क्राईम ब्रँचकडे हिंसाचाराचा तपास सोपवला जाण्याची शक्यता आहे.