अमळनेर येथे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा संपन्न

अमळनेर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पायोनियर संकरीत मका P३३०२ तर्फे भव्य शेतकरी मेळाव्यचे आयोजन नुकतेच श्रीमती इंदीरा गांधी विद्यालयातील प्रांगणात करण्यात आले. या मेळाव्यात पंजाबराव डख(पाटील)यांचे बहुमुल्य मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभले.

 

शेतकरी मेळाव्यात अमळनेर,पारोळा, चोपडा, धरणगाव, एरंडोल येथील प्रगतशील शेतकऱ्यांनी आवर्जून उपस्थीती लावली. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी, वक्ता, हवामान शास्त्रज्ञ डॉ. पंजाबराव डख(पाटील) यांनी सर्व शेतकऱ्यांना मका पीकाच्या वाणाविषयी व हवामान अंदाजाबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. पंजाबराव डंख (पाटील)यानी सर्व शेतकऱ्यांना येणाऱ्या खरीफ हंगामाकरीता पायोनीअर कंपनीचे प्रचलीत P3302 हे वाण कसे फायदेशीर होऊ शकते त्याबद्दल मार्गदर्शन केले. कमी कालावधीत परिपक्वता, अतीशय मजबूत मुळे, विपरीत परिस्थीतीशी लढण्याची क्षमता, व कैप्सुल दाणा अशी या वाणाची वैशिष्ठे नमुद्र केली. पंजाबराव डख पाटील यांच्याहस्ते मागील खरीप 2021 हंगामातील मका वाण P3302 चे सरासरी एकरी 30 ते 35 क्लिंटल उत्पादन घेणाऱ्या पंचक्रोशीतील १८ जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी अमळनेर ,पारोळा, धरणगाव, चोपडा, एरं’डोल ५० पेक्षा अधिक गावातील ११०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी तसेच परिसरातील वितरक व विक्रेत्या बंधूनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद तराळ यांनी शेतकऱ्यांना बहुमुल्य मार्गदर्शन केले. पायोनियर सीड्सचे अग्रोनॉमिस्ट स्वप्निल कुलकर्णी सरानी योग्य वाणाची निवड, पंचसूत्री, खत व्यवस्थापन, किड नियंत्रण याबद्दल सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाला कृषी अधिकारी भरत वारे ,अमळनेर तालुक्यातील प्रमुख कृषी विक्रेते, संघटनेचे अध्यक्ष योगेश पवार तसेच पायोनिअर सिडसचे वितरक – किरण अँगो एजेंसी व विजय एजन्सी चे संचालक यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाला पायोनियर सिडस् कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक विवेक राठोड (पाचोरा) व प्रमोद जाधव (जामनेर) आणि सर्व कंपनी कर्मचारी -लखनसींग पाटील, शंकर चौधरी, विकास कोळपे, नरेंद्रसिंग पाटील, प्रमोद कोळी, गुलाब पाटील यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन विजय पाटील यांनी तर पायोनिअर सीडसचे क्षेत्रीय व्यवस्थापक मंदार निगडे यांनी आभार मानून शेतक-यांना येणाऱ्या खरीप हंगामाच्या शुभेच्छा दिल्या.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!