अमळनेर येथे ग.स. सोसायटी निवडणुकीत ८०. ५७ टक्के मतदान

अमळनेर , लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | ग. स. सोसायटीचे मतदान शांतेत पार पडले. सकाळपासून मतदारांनी नागरिकांनी गर्दी केली होती. अमळनेर केंद्रावर ८०. ५७ टक्के मतदान झाले.

 

अमळनेर केंद्रावर एकूण ३०११ मतदान होते. यातील २४८३ सदस्यांनी मतदान केले. अमळनेर केंद्रावरील ७ बूथवर ८०. ५७ टक्के मतदान झाले. केंद्रावर बूथ वाईज झालेलं मतदान बूथ क्र.१-४३० पैकी ३८१, बूथ क्र.२-४४० पैकी ३६१, बूथ क्र.३ – ४४० पैकी ३३७, बूथ क्र. ४ – ४४० पैकी ३९१, बूथ क्र. ५ ४४० पैकी ३२८, बूथ क्र. ६ – ४४० पैकी ३०६ तर बूथ क्र. ७ – ३८१ पैकी ३०२ असे एकूण २४२७ मतदान झाले आहे. तर मतदानाची टक्केवारी ही ८०.५७ आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!