अमळनेर येथील एलआयसी विमा प्रतिनिधीचे काम बंद आंदोलन

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | ऑल इंडिया लाईफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन यांच्या वतीने अमळनेर शाखा कार्यालयासमोर घोषणा देत आंदोलन करण्यात आले.

पॉलिसी धारकांचा बोनस वाढला पाहिजे, विमा प्रतिनिधींना आरोग्य विमा योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, विमा प्रतिनिधींचे कमिशन वाढले पाहिजे, पॉलीसी धारकांच्या कर्जावरील व्याज कमी झालेच पाहिजे अशा पध्दतीने घोषणा बाजी करण्यात आली असून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे देखील सांगण्यात आले.

आजच्या दिवशी महिना अखेरीस सर्व विमा प्रतिनिधी यांनी आपले काम पूर्णतः बंद ठेवलेले होते.

Protected Content