अमळनेरात विविध विकास कामांचे भूमिपूजन व आमदार पाटील यांचा सत्कार

अमळनेर, प्रतिनिधी | शहरातील ढेकूरोडवर प्रभाग क्र. ७ मधील १ कोटी १० लक्ष रुपये किंमतीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व आमदार अनिल पाटील यांचा जिल्हा बँकेवर बिनविरोध झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

 

ढेकू रोडवरील भगवती नगरमध्ये विकास कामांचे भूमिपूजन व आमदार पाटील अनिल पाटील यांचा सत्कार सोहळा पार पडला. याप्रसंगी आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते वृंदावन व रेऊ नगरातील ५० लाख ७५ हजार रुपयांचे रस्ते काँक्रीटीकरण तर दीपक नगर मधील  रस्ते काँक्रीटीकरण २० लाख १५ हजार रुपये, महात्मा फुले कॉलनीतील काँक्रीट करणे १० लाख ४ हजार रुपये, भगवती नगरातील रस्ते काँक्रीटीकरण करणे २९ लाख ६६ हजार रुपये या कामांचे भूमिपूजन करण्यात आली. यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, विनोद भैया पाटील , अनिल शिसोदे , सुलोचना वाघ , प्रा अशोक पवार, नाना पाटील, एल टी पाटील, देशमुख दादा, सुरेश पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
या वेळी विजवितरण कंपनीचे दीपक बिऱ्हाडे यांचा चांगल्या कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. तर राजमुद्रा फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यायाम शाळा मागणीचे निवेदन दिले. जेष्ठ नागरिक प्रकाश पाटील यांनी माजी आमदार साहेबराव पाटील यांच्याकडे ओपन प्लेस मधील स्वच्छता करण्याबाबत गाऱ्हाणे मांडली. प्रास्ताविक आरोग्य व स्वछता समितीचे सभापती व संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष श्याम पाटील यांनी केले.
यावेळी बोलतांना माजी आमदार साहेबराव पाटील म्हणाले की , ६० महिन्यात १८ महिने कोरोनात तर  २२ नगरसेवक अपात्र केले गेले. यामुळे काम करता आले नाही आता आमदार अनिल पाटील यांच्या सहकार्याने १० कोटी ५० लाखांची कामे मिळाली या प्रभागात सुमारे ३२ कामे ६ कोटी रुपयांची दिली आहेत. पालिकेचा उरलेला कालावधी सुखरूप गेल्यावर आम्हाला  टाटा बाय बाय करू द्या असेही त्यांनी सांगितले यामुळे यापुढे भविष्यात निवडणूकीची चाहूल यानिमित्ताने लागली आहे.

यावेळी आमदार अनिल पाटील म्हणाले की, पालिकेच्या विकास कामाच्या आराखड्याला खीळ बसविला तरी ५ वर्षात अनेक कामे झाली. सर्वाधिक मते या ७ व ८ प्रभागात मिळाली असून आम्ही कोरोना काळात चांगले काम केले. २ वर्षाच्या आमदारकी काळात १८ महिने कोरोना काळ गेला. प्रतिकूल परिस्थितीत कामे आणली. अजून ५ कोटींची कामे होतील. ८ दिवसात तालुकास्तरावर २ कोटी काम वाचनालय, अभ्यासिका मिळणार आहेत. याचा स्पर्धा परीक्षांचा  विद्यार्थ्यांना फायदा होईल. ढेकू रोडवर स्मशानभूमीची आवश्यकता असून त्याबाबत प्रयत्न सुरू आहे. या भागात पाणी व्यवस्था सुरळीत केला, कचरा व्यवस्थापन केले. भुयारी गटारीमुळे रस्ते खराब झाले असतील अडचणी असतील.  पण भविष्यात त्याचा फायदा आहे.शहराचा विस्तारचा विचार करता स्टोअर रेंज प्लॅन्ट आणणे गरजेचे आहे. २ वर्षात ६८ अवैध धंदे करणाऱ्या लोटगाड्याबंद केल्या, शहरातील अवैध धंदे बंद केले, गुन्हेगारी बंद केली. दगडी दरवाजा जवळील नवीन काम मंजूर केले, त्यामुळे वाहतुकीचा श्वास मोकळा केला. येत्या पालिका निवडणुकीत कटाक्षाने लक्ष असू द्या असे आवाहन आमदार पाटील यांनी यावेळी केले.
याप्रसंगी विजय चव्हाण , अनिल बोरसे , किरण सूर्यवंशी , काटकर सर , विशाल देशमुख, दिनेश सूर्यवंशी, मनोज पाटील, प्रभाकर शिंदे, प्रभाकर पाटील, देवरे काका , युवराज पाटील, किशोर महाले, किशोर पाटील, शेखर धनगर, सुनील चौधरी, गणेश पाटील , किरण पाटील , अक्षय चव्हाण , दर्पण वाघ , किशोर पाटील , तेजस पवार , जयवंत पाटील , उज्वल मोरे , राहुल पाटील , निनाद शिसोदे , राज सूर्यवंशी , सारंग सूर्यवंशी , गौरव पवार , मयूर पाटील , आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन दयाराम पाटील तर आभार उमेश काटे यांनी मानले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!