अमळनेरात रक्तदान महाशिबीराचे आयोजन

अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाची माहिती

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषदेतर्फे अमळनेर शहरात महारक्तदान शिबिराचे आयोजन शनिवारी १७ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. विशेष म्हणजे शहरातील सात ठिकाणी शिबीर घेण्यात आले आहे.

रोटरी क्लब ऑफ अमळनेर,लायन्स क्लब ऑफ अमळनेर, जैन सोशल ग्रुप, सकल जैन समाज नवयुवक मंडळ, प्रफुल्ल कॉमर्स क्लासेस, एचडीएफसी बँक अमळनेर, श्री स्वामीनारायण मंदिर संस्था, राष्ट्रीय सेवा केंद्र, मुंदडा फाउंडेशन, खानदेश शिक्षण मंडळ व धनदाई महाविद्यालय आणि इतर सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने हे मेगा ब्लड डोनेशन ड्राइव तथा महारक्तदान शिबिर आयोजित केले आहे.

यानिमित्ताने प्रथमच 1008 बॅग रक्त संकलनाचे उद्दिष्ट असल्याने अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाने देखील या महा शिबिरास आपले समर्थन दिले आहे.

शिबिर
1)तेरापंथ भवन अर्बन बँक जवळ अमळनेर
2)रोटरी हॉल,पिबीए स्कुल जवळ अमळनेर
3)टाउन हॉल अमळनेर
4)स्वामीनारायण मंदिर अमळनेर
5)प्रताप महाविद्यालय अमळनेर
6)मुंदडाफाउंडेशन मुंदड़ा नगर गलवाडे रोड अमळनेर
7)धनदाई महाविद्यालय ढेकु रोड अमळनेर

या शिबीरात इच्छुकांनी रक्तदार करण्याचे आवाहन आयोजकांसह अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे. अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघातर्फे समर्थन देताना अध्यक्ष चेतन राजपुत, जेष्ठ पत्रकार डिगंबर महाले, संजय पाटील, किरण पाटील, महेंद्र रामोशे, जितेंद्र ठाकूर, उमेश काटे, जयेश काटे, महेंद्र पाटील, उमेश धनराळे, मुन्ना शेख, आर जे पाटील, राहूल पाटील, जयंत वानखेडे, कमलेश वानखेडे, समाधान मैराळे, सुरेश कांबळे, अजय भामरे यासह इतर पत्रकार बांधव उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content