अमळनेरात भारतीय जनता युवा मोर्चातर्फे ‘विकास तीर्थ’ मोटरसायकल रॅलीचे आयोजन

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाची आठ वर्षे यशस्वी कारकीर्द पूर्ण झाल्याबद्दल तालुक्यात भारतीय जनता युवा मोर्चातर्फे प्रदेश सचिव भैरवी पलांडे यांच्या नेतृत्वाखाली ‘विकास तीर्थ’ मोटरसायकल रॅली शनिवार दि. ११ जून रोजी काढण्यात आली.

 

‘विकास तीर्थ’ मोटरसायकल रॅलीत विकास तीर्थ ध्वजावर महाराष्ट्राचा नकाशा साकारण्यात आला होता. त्यावर पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या विकास योजना सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहचाव्यात, गोरगरिबांनी लाभ घ्यावा म्हणून महाराष्ट्र भर मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. चोपड्यातून विकास तीर्थ ध्वज अमळनेर तालुक्याच्या हद्दीवर आल्यावर केंद्र शासनाच्या रेल्वे उड्डाण पुलावरून रॅलीला सुरुवात झाली. सिंधी कॅम्प , शनीपेठ ,पैलाड , फरशी रोड ,गांधलीपुरा ,आंबेडकर चौक ,पाचकंदील चौक ,दगडी दरवाजा ,बसस्टँड , विश्रामगृह , पाटील कॉलनी , भगवा चौक , वड चौक , झामी चौक , राजहोळी चौक, सराफ बाजार, महाराणा प्रताप चौक, बाजार समितीपर्यंत रॅली काढण्यात आली. रॅलीत प्रदेश सचिव भैरवी वाघ पलांडे , जिल्हा पदाधिकारी राकेश पाटील, योगीराज चव्हाण, घनश्याम पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शिवाजी राजपूत, शहराध्यक्ष पंकज भोई, सरचिटणीस विलास सुर्यवंशी, भूषण देवरे, राहुल चौधरी, समाधान पाटील, उपाध्यक्ष रवी पाटील, हिरालाल पाटील, कल्पेश पाटील, शिव किरण बोरसे, गौरव सोनार, कुणाल गिरासे, सौरभ पाटील, सागर शेटे, रवी ठाकूर, मुशाहिद शेख,निखिल पाटील युवा मोर्चाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
फटाके फोडून जल्लोष !
तसेच राज्यसभेवर भाजपने जास्त जागांवर विजय मिळवल्याबद्दल महाराणा प्रताप चौकात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ, माजी आमंदार डॉ. बी. एस. पाटील, तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष उमेश वाल्हे, विधानसभा क्षेत्र प्रमुख शितल देशमुख, माजी जि. प. सदस्य संदीप पाटील, सरचिटणीस राहुल पाटील, राकेश पाटील, उपाध्यक्ष महेंद्र पाटील, मच्छिंद्र राजपूत, संजय पाटील, ओबीसी मोर्चा जिल्हा सचिव प्रल्हाद पाटील, महिला मोर्चा छायाताई भामरे, किरण पाटील, दिपक पवार, अविनाश पाटील, आयाज बागवान आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!