अमळनेरात गावठी पिस्टल बाळगणाऱ्या चार संशयितांवर गुन्हा

अमळनेर प्रतिनिधी । बेकायदेशीर गावठी पिस्टल व तीन जिवंत काडतूसे बाळणाऱ्या चार जणांवर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पंकज उर्फ बंटी शंकर रा. आंबेगाव पुणे, मनोज उर्फ मयूर भाऊसाहेब गायकवाड रा. जाधववाडी ता. हवेली जि.पुणे, ओकार प्रकाश नाळे रा. द्वारका नगर पुणे आणि प्रशांत शिवाजी गुरव रा. तुकाराम नगर पुणे असे संशयित आरोपींचे नावे आहे.  पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील स्टेट बँक चौकातील स्वामी नारायण मंदीरासमोर चार तरूण कारमध्ये संशयास्पद हालचाली अमळनेर पोलीसांना गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार काल मंगळवारी २० जुलै रोजी रात्री ९ वाजता स्थानिक पोलीसांनी छापा टाकून पंकज उर्फ बंटी शंकर रा. आंबेगाव पुणे, मनोज उर्फ मयूर भाऊसाहेब गायकवाड रा. जाधववाडी ता. हवेली जि.पुणे, ओकार प्रकाश नाळे रा. द्वारका नगर पुणे आणि प्रशांत शिवाजी गुरव रा. तुकाराम नगर पुणे यांच्याकडे एक गावठी बनावटीची पिस्टल व ३ जीवंत काडतूसे आढळून आले आहे. त्यांच्याजवळील कार व महागडा मोबाईल पोलीसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल हाटकर करीत आहे. 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!