अमळनेर, प्रतिनिधी | येथिल पू. सानेगुरुजी वाचनालय ग्रंथालय येथे साहित्य विश्वात बहुचर्चित ठरलेल्या ‘भुरा’ या ग्रंथाचे लेखक डॉ. शरद बाविस्कर यांचा जाहिर संवादाचा कार्यक्रम दि.२९ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.
दिल्ली येथिल जेएनयु विश्व विद्यालयाचे फ्रेंच तत्वज्ञानाचे प्राध्यापक असलेले डॉ.शरद बाविस्कर यांचा मूळच्या धुळे तालुक्यातील एका छोट्या खेड्यापासून लंडन, फ्रांस असा देश-विदेशातील प्रेरणादायी प्रवास उलगडणारे आत्मचरित्र असलेले ‘भुरा’ या ग्रंथावर जाहीर संवाद साधण्यासाठी लेखक डॉ.शरद बाविस्कर हे स्वतः उपस्थित राहणार आहेत. यावेळी ‘परिवर्तनाचा वाटसरू’ चे संपादक प्रा.देवेंद्र इंगळे, चिंतनशिल असे वक्ते प्रा.नितिन पाटील,सामाजिक कार्यकर्त्या दर्शना पवार,युवा वक्ते ऍड.सारांश सोनार, आदि या संवादात सहभागी असतील.कार्यक्रमाचे अध्यक्ष कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ.प्रमोद पवार असतील.कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालक प्रा.लिलाधर पाटील असतील. अमळनेर च्या साहित्य चळवळीला सातत्याने चालना देण्यासाठी विविध साहित्यिक कार्यक्रम आयोजित करणारे कार्यकर्ते पू साने गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे,सचिव प्रकाश वाघ,म सा प चे कार्याध्यक्ष कवी रमेश पवार, सामजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, क्रांतिसिंह नाना पाटील साहित्य अकादमीचे प्रा.सुनिल वाघमारे,विद्रोही चे संपादक गौतम सपकाळे आदि सह सामाजिक व साहित्य चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थितीचे जाहीर आवाहन केले आहे.