अमरावतीत घरात घुसून तरुणाची कुटुंबियांसमोर निर्घुण हत्या !

शेअर करा !

अमरावती (वृत्तसंस्था) अमरावतीच्या तिवसा येथील आंबेडकर चौक परिसरात चार जणांनी एका तरुणाची त्याच्या कुटुंबियांसमोर निर्घुण हत्या केली. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. अजय बाबाराव दलाल असे मृत तरुणाचे नाव आहे.

अजय रेतीचा व्यवसाय करायचा. तो रविवारी दुपारी त्याच्या घरी कुटुंबियांसोबत होता. दरम्यान, दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्याच्या घराबाहेर तीन चारचाकी गाड्या आल्या. या गाड्यांमधील चार जण अजयच्या घरात शिरले. त्यांनी अजयच्या घरच्यांना बंदूक दाखवत बाजूला केले. अजयवर हल्ला करणाऱ्या आरोपींनी त्याच्या कुटुंबियांना बंदूक दाखवत आडवे येऊ नका, असा दम भरला. त्यानंतर अजयच्या मांडीवर सपासप वार केला. त्यांनी अजयला गंभीर जखमी करून पळ काढला. अजयला जखमी अवस्थेत तिवसा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान अजयचा मृत्यू झाला.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!