अभिनेत्री कंगनाच्या घराबाहेर गोळीबार

मुंबई (वृत्तसंस्था) बॉलीवूड क्विन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंगना रणौतच्या मनालीतील घराबाहेर गोळीबार करण्यात आला आहे, अशी तक्रार स्वत: कंगनाने नोंदवली आहे.

 

एका मुलाखती दरम्यान तिने या घटनेबाबत माहिती दिली. ‘मी रात्री माझ्या रूममध्ये झोपली होती. तेव्हा जवळपास ११.३०च्या दरम्यान मला फटाक्यांसारखा आवाज आला. सुरवातीला फटाक्यांचा आवाज आहे असे समजून मी या घटनेकडे दुर्लक्ष केले. पण पुन्हा ८ सेकंदांमध्ये दोन वेळा मला आवाज आला. अखेर मी पोलिसांकडे तक्रार केली. मला घाबरवण्याचा प्रयत्न करण्यासाठी असे कट रचले जात असल्याचे मत तिने व्यक्त केले आहे. तिने ही तक्रार कुलु पोलिसांकडे केलीय. सुशांतसिंहच्या आत्महत्येनंतर कंगनाने जो नेपोटिझमविरोधात आवाज उठवलाय तो दाबण्यासाठी, तिला धमकावण्यासाठी हा प्रकार केला असल्याचे कंगणाचे म्हणणे आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.