अभिनेता आमीर खानच्या ७ कर्मचा-यांना कोरोनाची बाधा !

मुंबई (वृत्तसंस्था) प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता आमीर खानच्या ७ कर्मचा-यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यामध्ये आमीर खानचा एक ड्रायव्हर, दोन सुरक्षा रक्षक आणि त्याच्या घरात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

 

सोशल मीडियावरील एक पत्रक पोस्टद करत आमिरने यासंदर्भात माहिती दिली आहे. त्याच्या घरातील कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाल्याचे त्यात म्हटले आहे. कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी प्रभावी पाऊल उचलत त्यांना लगेच क्वॉरंटाइन सेंटरमध्ये हलवण्यात आले. मी बीएमसीचे आभार मानतो की, त्यांची व्यवस्थित काळजी घेतली जात आहे. एवढेच नाहीतर त्यानंतर बीएमसीच्या वतीने संपूर्ण सोसायटी व्यवस्थित सॅनिटाइज करण्यात आली. आम्हा सर्वांच्याही टेस्ट करण्यात आल्या असून आम्हा सर्वांच्या टेस्ट नेगेटिव्ह आल्या आहेत. सध्या मी माझ्या आईला कोरोना टेस्टसाठी घेऊन जात आहे. मी प्रार्थना करतो की, माझी आईचा रिपोर्टही नेगेटिव्ह येईल.

Protected Content