अफगाणिस्तान चर्चेसाठी रशियाकडून पाक, चीन, अमेरिकेला आमंत्रण

 

मास्को : वृत्तसंस्था ।  रशियाने अफगाणिस्तानसाठी ‘मॉक्सो फॉर्मेट’ तयार केला  आहे. या बैठकीचं पाकिस्तान, चीन, अमेरिका या देशांना आमंत्रण दिलं आहे. मात्र भारताला या बैठकीपासून दूर ठेवण्यात आलं आहे.

 

अमेरिकेचं लष्कर अफगाणिस्तानमधून बाहेर पडल्यानंतर पुन्हा एकदा तालिबाननं डोकं वर काढलं आहे. अफगाणिस्तानमधील बदलती स्थिती पाहता रशियाने चिंता व्यक्त केली आहे. तालिबानचे वाढते हल्ले आणि हिंसाचार रोखण्यासाठी रशियाने पुढाकार घेतला आहे. अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी रशियाने एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे.

 

विस्तारित ट्रोइका बैठकीचं आयोजन ११ ऑगस्टला कतारमध्ये करण्यात आलं आहे. या बैठकीसाठी १८ मार्च आणि ३० एप्रिलला चर्चा करण्यात आली होती.

 

भारताकडून विस्तारित ट्रोइका बैठकीबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही. “रशिया भारत आणि अन्य देशांसोबत काम करत आहे. अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांचं योगदान महत्त्वपूर्ण ठरेल.”, असं मागील महिन्यात रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेइ लावरोव यांनी सांगितलं होतं.

 

भारताच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीत अफगाणिस्तानमधील स्थितीवर चर्चा केली जाणार आहे, अशी घोषणा संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत टी एस तिरुमूर्ती यांनी केली आहे. भारताचे अफगाणिस्तानमधील राजदूत फरीद मामुन्दजे यांनी ही बैठक सकारात्मक पाऊल असल्याचं बोललं आहे.

 

दोन दशकात भारतानं अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. भारतानं अफगाणिस्तानात २१८ किमी लांबीचा डेलराम ते झरांज सलमा डॅमपर्यंत रस्ता बांधला आहे. त्याचबरोबर २०१५ मध्ये अफगाणिस्तान संसद इमारतीचं काम पूर्ण करून लोकार्पण केलं होतं. अफगाणिस्तानातील भारतानं केलेली ही सर्वात मोठी कामं आहेत. भारतानं नवा अफगाणिस्तान उभारण्यासाठी मोलाची साथ दिली होती. खासकरून शिक्षणक्षेत्रात भारतानं योगदान दिलं होतं. शिक्षक आणि स्टाफला प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला होता.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!