अपघातातील जखमी तरूणाचा मृत्यू

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । समोरासमोर झालेल्या दोन दुचाकींच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या २३ वर्षीय तरूणाचा उपचारादरम्यान बुधवारी रात्री मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, २७ जुलै रोजी शिरसोली ते जळगाव दरम्यान समोरासमोर दोन दुचाकींच्या अपघातात ललित अशोक अस्वार (वय-२३) रा. शिरसोली प्र.न.हा तरूण गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला जळगाव येथील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होतो. या अपघातात तीन जण जखमी झाले होते. यापुर्वी यातील पवन चौधरी याचा देखील यापुर्वी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अपघाताच्या दिवसांपासून ललित अस्वार हा देखील मृत्यूशी झुंज देत होत. बुधवार ५ ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयत ललितच्या पश्चात आई सरलाबाई, वडील अशोक तुकाराम बारी, भाऊ विजय, विवाहित बहिण असा परिवार आहे. दरम्यान, ललितची परिस्थिती अत्यंत हालाखीची असून सामाजिक कार्यकर्त्या मंगला बारी यांनी पुढाकार घेवून मुलीच्या कुटुबियांना आर्थीक मदत जाहीर केली.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!