अनोरे विद्यालयाचा शालांत परीक्षेचा निकाल शंभर टक्के : जगदीश सोनवणे प्रथम

शेअर करा !

 

धरणगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील कै. बी. जे. महाजन विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल १००% लागला असून यशाची परंपरा कायम ठेवली आहे.मार्च २०२० मध्ये ५६ विद्यार्थ्यी परीक्षेला बसलेले होते त्यापैकीच सर्वच विद्यार्थी पास झाल्याने शाळेने दैदिप्यमान यश संपादन केले आहे.

store advt

अनोरे विद्यालयात जगदीश ज्ञानेश्वर सोनवणे याने ९३.६०%. गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक- गायत्री सुकलाल महाजन ९२.२०%, तृतीय क्र.- कु. कोमल गुलाब पाटील ९१.६०%, चौथा क्रं.-तुषार श्रावण बागुल-९१.००% , पाचवा क्रं.-(विभागून)- विशाल गौतम वाघ-९०.६०% व कल्पेश रविंद्र महाजन – ९०.६०% याप्रमाणे यश संपादन केले आहे. ५६ मुलांपैकी जवळपास १० मुलांनी ९०% पेक्षा जास्त गुण मिळून यश संपादन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व संचालक मंडळ तसेच शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!