अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाचा समावेश करू नये

एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्यची मागणी

 

जळगाव, प्रतिनिधी । अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाचा समावेश करू नये अशी मागणी एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनाचा आशय असा की, धनगर समाज हा आर्थिक व राजकीयदृष्टया सक्षम असून अनेक अभ्यास गटांनी त्यांची मागणी चुकीची असल्याचे स्पष्ट केल्याने त्यांचा आदिवासींमध्ये समावेश होउ शकत नाही. आदिवासी व धनगर समाजाच्या परंपरा, भाषा, स्वभाव वैशिट्य यांच्यात मूलभूत फरक आहे. उत्तर भारतीय धनगड या आदिवासी जातीचे नामसाधर्म्यचा फयदा उचलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आर्थिक व राजकीय दृष्टया सक्षम असल्याने धनगर समाजातील काही नेते आदिवासींच्या राजकीय आरक्षणावर डोळा ठेऊन धनगर समाजाची फसवणूक करीत असल्याचे म्हटले आहे. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर आता कुठे आदिवासी समाज राजकीय दृष्टया सक्षम होत असतांना प्रस्थापित धनगर समाजास अनुसूचित जमातीत आरक्षण देऊ नये अशी मागणी जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.