अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेकरिता मोफत प्रशिक्षण

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | अनुसुचित जमातीतील उमेदवारांना स्पर्धा परिक्षाकरिता ३ महिने १५ दिवसांचे प्रशिक्षण कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, रावेर मोफत दिले जाणार आहे. प्रवेशाकरिता संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.

 

अनुसुचित जमातीतील उमेदवारांना स्पर्धा परिक्षाकरिता १ एप्रिल, २०२२ ते १५ जुलै, २०२२ असे एकुण ३ महिने १५ दिवसांचे प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे.  प्रवेश मिळवण्याकरीता www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावर नांव नोंदणी करणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी उमेदवार हा अनुसूचित जमातीचा असावा. (जातीचा दाखला आवश्यक), उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, उमेदवार हा शालांत परिक्षा (१० वी) उत्तीर्ण असावा, उमेदवार हा १८ वर्ष वय पुर्ण झालेला असावा असे निकष ठेवण्यात आले आहेत.या प्रशिक्षणाअंतर्गत आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना विविध शासकीय, निमशासकीय निवड समित्यांमार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परिक्षांची तयारी करुन घेतली जाते. प्रशिक्षण काळात उपस्थित प्रशिक्षणार्थी उमेदवारांना दरमहा रु. १०००/- विद्यावेतन देण्यात येते. प्रशिक्षणामध्ये प्रवेश मिळविण्याकरीता शाळा सोडल्याचा दाखला, १० वी, १२ वी गुण पत्रिकेची प्रत, आधारकार्ड, बॅक पासबुक झेरॉक्स, दोन पासपोर्ट साईज फोटो, जातीचा दाखला या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती व मुळ प्रती असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, प्लॉट नं. 2, शनि मंदीरा मागे, स्टेशन रोड, पंचायत समिती जवळ रावेर येथे प्रत्यक्ष १० ते २ वाजेपर्यंत सपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच प्रशिक्षणाच्या साडेतीन महिन्याच्या कालावधीत उमेदवारांना राहण्याची व भोजनाची व्यवस्था स्वत:करावी लागेल. संर्पकासाठी दुरध्वनी क्रमांक – ०२५८४-२५१९०६ , भ्रमणध्वनी क्रमांक – ९६२३९ ३६४८८ असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी वि.जा. मुकणे रावेर, यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!