अनिल देशमुख यांची आज सीबीआय चौकशी

 

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । माजी  गृहमंत्री अनिल देशमुख सीबीआय चौकशीसाठी हजर झाले आहेत. डीआरडीओ गेस्ट हाऊसवर अनिल देशमुख यांची चौकशी होणार असून सीबीआय अधिकारीदेखील पोहोचले आहेत. अनिल देशमुख यांना चौकशीसाठी सीबीआयकडून समन्स बजावण्यात आलं होतं.

 

मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याकाठी १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा दावा सिंह यांनी पत्रात केला. देशमुख हे पोलीस कामकाजातही सतत ढवळाढवळ करत होते, असेही त्यांनी पत्रात नमूद केलं होतं.

 

 

परमबीर यांनी आधी सर्वोच्च न्यायालयात आणि नंतर उच्च न्यायालयात याचिकाही केली. सिंह यांच्या पत्राचा हवाला देत अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका करून या  सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने सीबीआयला दोन आठवड्यांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

 

प्राथमिक चौकशीसाठी दिल्लीहून मुंबईत आलेल्या सीबीआयच्या विशेष पथकाने आतापर्यंत सिंह, अ‍ॅड. पाटील, वाझे, साहाय्यक आयुक्त संजय पाटील, पश्चिाम उपनगरांतील बार मालक महेश शेट्टी यांच्यासह संबंधित अन्य काहींचे जबाब नोंदवून घेतले आहेत. देशमुख यांच्याकडे हे पथक चौकशी करणार आहे

Protected Content