अट्रावलचे सरपंच व डांभुर्णीचे ग्रामपंचायत सदस्य झाले अपात्र

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील अट्रावल येथील सरपंच यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही तसेच डांभुर्णी येथील ग्रामपंचायत सदस्य यांनी जात वैद्यता प्रमाणपत्र संदर्भात बनावट टोकन सादर केले म्हणून जिल्हाधिकारी यांनी दोघांना अपात्र ठरवले आहे.

 

यावल तालुक्यात जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकी मध्ये अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवरून मोहन भिमराव कोळी हे निवडून आले होते. ते सरपंच बनले होते. दरम्यान त्यांनी मुदतीत अनुसुचित जमातीचे वैधता जात प्रमाणपत्र सादर केले नाही म्हणून त्यांना जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी अपात्र घोषित केले आहे. तसेच डांभुर्णी ग्रामपंचायतच्या सदस्य सुनंदा हिरालाल कोळी यांनी जून २०२२ मध्ये पोटनिवडणूकीत अनुसुचित जामातीच्या राखीव जागेवर निवडणुक लढवली होती. या पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी जात वैद्यता प्रमाणपत्र करीता सादर केले असल्याचे टोकन अर्जा सोबत जोडले होते. मात्र, सदर टोकन हे बनावट असल्याचे प्रशासनाचे निदर्शनास आले असुन, जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दोघांना अपात्र ठरवले आहे.

 

जात वैधता प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर अट्रावल सरपंच व डांभुर्णी सदस्य हे दोघे अपात्र ठरले आहे. या संदर्भातील आदेश यावल तहसील कार्यालयात प्राप्त झाले असून तहसीलदार महेश पवार यांनी या संदर्भातील आदेश बजवण्याच्या सूचना प्रशासनास दिल्याचे म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content