अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा ते भुसावळ रोडवर भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघे जखमी झाले आहे. याबाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर राजू पवार रा. सुरवाडा ता. बोदवड हा मित्र दिलीप रमेश पवार यांच्यासोबत दुचाकी क्रमांक (एमएच ०४ बीएफ ८२५७) ने रविवारी २४ जुलै रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास गारखेडा ते सुरवाडा दरम्यान जात असताना रस्त्यावरील कुऱ्हा गावाजवळ भरधाव वेगाने येणारी कार क्रमांक ( एमएच १९ सीएफ ४८७७) ने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघे खाली पडले. दोघांना किरकोळ जखमी झाली तर दुचाकीचे नुकसान झाले. दोघांना तातडीने भुसावळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. याबाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात कार क्रमांक (एमएच १९ सीएफ ४८७७) च्या कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दीपक जाधव करीत आहे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.