अज्ञात वाहनाच्या धडकेत तळवेलचा तरूण ठार

वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील महामार्ग क्रमांक सहावर कपिल वस्ती जवळ भुसावळ हुन वरणगावकडे ग मोटर साईकलने येणाऱ्या युवकास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी २३ मार्च रोजी दुपारी १.३० वा सुमारास घडली वरणगाव पोलिसांत अज्ञात वाहन चालका विरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे

मिलींद भागवत राणे (वय.४० ) रा. (होळी मैदान) तळवेल ता. भुसावळ हा युवक भसावळ येथुन दुपारी १.३० वाजे. दरम्यान मोटरसाईकल क्र. एमएच.१९.एल. ७१७१ने घराकडे जात असतांना कपिल वास्तू नगर जवळ एका कोणत्या तरी अज्ञात वाहनचालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवित रस्त्याच्या परीस्थीतीकडे दुर्लक्ष करीत मोटर साईकलला जोरदार धडक दिल्याने मिलिंद चा महामार्गावरील दुभाजका जवळ मृत्यू झाला अशी फिर्याद मयताचे काका विलास जनार्दन राणे ( वय ५८ )यांनी वरणगांव पोलिस ठाण्यात दिली असून पुढिल तपास सपोनि आशिष कुमार आडसुळ यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय परशुराम दळवी, पो.हे.कॉ.मुकेश जाधव करीत आहे मयत मिलिंद राणे हा भुसावळ नगर परीषदेत कंत्राटी पध्दतीने पाणीपुरवठा विभागात कामाला होता. त्याच्या पश्चात आईवडील, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे. मिलिंदच्या अपघाती मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content