अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप (व्हिडीओ )

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

 

माजी उपमुख्यमंत्री  तथा विधानसभा विद्यमान विरोधीपक्षनेते अजितदादा  पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात  राष्ट्रवादीचे नेते आ. एकनाथराव खडसे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यासोबत  गरजू विद्यार्थ्याना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप  महिला बचत गट उत्कृष्ट काम करणाऱ्यां  महिलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यात कृष्ण सखी महिला बचत गट अध्यक्ष रुपाली राजू बाविस्कर, नलिनी सोनवणे आदींचा समावेश होता.  हा उपक्रम  सामाजिक न्याय विभाग जिल्हा उपाध्यक्ष  रमेश बारे,  इब्राहिम तडवी सर व   राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर यांच्या वतीने घेण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड.  भैय्यासाहेब रविन्द्र पाटील ,  माजी आमदार मनिष जैन, महानगर जिल्हाअध्यक्ष अशोक लाडवंजारी,महिला आघाडी शहराध्यक्ष मंगला पाटील, वाल्मिक पाटील, रिक्कू चौधरी,अशोक पाटील, सुनील माळी, अमोल कोल्हे आदींची उपस्थिती होती.

 

भाग १

भाग २

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.