अजित पवार यांची निर्मल सिडस्‌ला सदिच्छा भेट

कृषि जैविक तंत्रज्ञानाची माहीती घेऊन केले कौतूक 

 

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पाचोरा येथील निर्मल सिडस्‌ला दि. १५ रोजी सदिच्छा भेट दिली.

यावेळी निर्मल सिडस्‌च्या संचालिका वैशाली सुर्यवंशी यांनी अजित पवार यांचे औक्षण केले. त्यानंतर निर्मल सिडस्‌चे संचालक डॉ. सुरेश पाटील, जे. सी. राजपुत, डी. आर. देशमुख, महाव्यवस्थापक सुरेश पाटील, प्रमोद दळवी आदी अधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी १५ मिनिटांच्या भेटीमध्ये त्यांनी मोठ्या आस्थेने वैशाली सुर्यवंशी यांची विचारपूस केली. तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला.

कंपनीच्या ३५ वर्षातील संशोधन कार्याची माहिती, कंपनीचे कृषि क्षेत्रातील योगदान, शेतीच्या शाश्वत विकासाला चालना देणारी देशातली पहिली “निर्मल कृषी जैव तंत्रज्ञान” प्रयोगशाळा या सर्वांची माहिती घेऊन त्यांनी वैशालीताईंसह सर्व संचालक मंडळाचे कौतूक केले. शेवटी जातांना त्यांनी वैशाली ताईंना आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत असे सांगत मोठा आधार दिला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अरुणभाई गुजराती, आमदार एकनाथ खडसे, आमदार अनिल पाटील, माजी पालकमंत्री डॉ. सतिश पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार राजीव देशमुख, जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील, संजय पवार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, निर्मल सिडस्‌चे संचालक डॉ. सुरेश पाटील, डॉ. जे. सी. राजपुत, डी. आर. देशमुख, वैशाली सुर्यवंशी, महाव्यवस्थापक सुरेश पाटील, प्रमोद दळवी, निर्मल स्कुलचे सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, जिल्हाप्रमुख दिपकसिंग राजपूत, रमेश बाफना, ॲड. अभय पाटील, अरुण पाटील, उध्दव मराठे, डॉ. संजीव पाटील, दत्ता बोरसे, शरद पाटील, गणेश परदेशी, दिपक पाटील, जे. के. पाटील, अनिल पाटील, गोरख पाटील, शंकर मारवाडी, राजु भैय्या, विनोद बाविस्कर, माधव राजपुत, विनोद राऊळ, दत्तु भोई, संदिप सोमवंशी, अन्नु शेख, योगेश पाटील, दत्ता जडे, पप्पु राजपुत, दादाभाऊ चौधरी, पप्पु जाधव, ॲड. दिपक पाटील, बबलू भोई, अनिल सावंत, खंडू सोनवणे, अजय पाटील, आनंद जैन, बंडू मोरे, संदिप जैन, भरत खंडेलवाल, संदिप चैाधरी, हरिष देवरे, भगवान पाटील, अजय कडुबा तेली, प्रितेश जैन, राजेंद्र राणा, सैय्यद गफ्फार, अण्णा परदेशी, हिलाल पाटील, अरुण तांबे, कमलेश मालकर, विनोद राजपुत, आनंद चौधरी, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष प्रविण पाटील, जिभाऊ पाटील, सुरेश शिंदे, राजेंद्र भोसले, राजेंद्र पाटील, अनिल मराठे, रवि पाटील, यश पाटील, सुधाकर पाटील, विठ्ठल एरंडे, सुनिल पाटील, विजय जाधव, लोकेश तुपे, गणेश पाटील, अभिषेक खंडेलवाल, नंदु शेलार, राकेश जोशी, माधव राजपुत सह शिवसेना, युवासेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content