पुणे (वृत्तसंस्था) पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार हे पुण्याचेच आहेत. त्यामुळे स्वत: अजितदादाचे पुण्याच्या परिस्थितीवर लक्ष असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगीतले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील विधानभवनात गुरुवारी बैठक झाली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, सुरुवातीच्या काळात मुंबई आणि पुण्यातच करोनाचे रुग्ण आढळत होते. आता राज्यातील अनेक भागात आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार प्रत्येक जिल्ह्याला सर्वतोपरी मदत करीत आहे. मात्र, आता आपल्याला करोनासोबत जगायला शिकले पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत शहरातील लोकप्रतिनिधींसमोर मांडली. तसेच कोरोना संकटाच्या काळात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनामध्ये समन्वय पाहिजे. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार हे पुण्याचेच आहेत. त्यामुळे स्वत: अजितदादाचे पुण्याच्या परिस्थितीवर लक्ष असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगीतले.