अचानक ब्रेक मारलेल्या ट्रक्टरला मागून दुचाकीची जोरदार धडक; दुचाकीस्वार ठार

जळगाव प्रतिनिधी । वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने अचानक ब्रेक लावल्याने मागून येणारी दुचाकीने ट्रक्टरला धडक दिल्याने दुचाकीस्वार प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कानसवाडा येथे आज सायंकाळी घडली.

संजय रामचंद्र सोनवणे (वय ४९, रा. कानसवाडा, ता. जळगाव) असे मयत झालेल्या प्रौढाचे नाव आहे. मिळालेली माहिती अशी की, आज रविवारी रात्री ७.३० वाजता सोनवणे हे दुचाकीने घरी जात होते. त्याचवेळी कानसवाडा शिवारात रस्त्यावरुन एक ट्रॅक्टर जात होते. या ट्रॅक्टरचालकाने अचानक ब्रेक लावल्याने ट्रक्टर जागीच थांबले. त्यावेळी ट्रक्टरच्या मागे भरधाव वेगाने येणारी दुचाकीवर संजय सोनवणे हे येत असतांना दुचाकी ट्रक्टरवर  धडकली. या अपघातात सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला. सोनवणे यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला होता.  ट्रॅक्टरचालकाच्या चुकीमुळे सोनवणे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. मृत सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. या बाबत अद्याप पोलीसात गुन्हा दाखल झालेला नाही.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!