अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप…(व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी ।  शुक्रवार दि.१६ जुलै  रोजी कालिंका माता मंदिरा जवळ पेटलेल्या इंधन टँकरची आग विझवण्यासाठी त्वरेने धाव घेऊन मोठी दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशमन दलाने परिश्रम घेतले त्याबद्दल नगरसेवक तथा अस्मि फाउंडेशनचे अध्यक्ष अमित काळे यांनी अग्निशमन विभागाचे अधिकारी व कर्मचारी वर्गाला कृतज्ञतापूर्वक सन्मानित केले.  

 

जळगाव नशिराबाद रस्त्यावरील कालिंका माता चौफुली येथील परिसरात शुक्रवार दि.१६ जुलै रोजी रात्री  ११.०० वाजेच्या सुमारास नगरसेवक अमित काळे हे त्यांच्या सहकार्‍यांसह प्रकल्प पाहण्यासाठी जात असतांना त्यांना राष्ट्रीय महामार्गावर इंधन टॅंकरने अचानक पेटतांना दिसला. त्या वेळेस इतर वाहनधारक व नागरीक तसेच व्यावसायिकांची धावपळ होऊन जिवाच्या भीतीने सारे सैरावैरा पळून दूर अंतरावर श्वास रोखून उभे राहिले होते. प्रसंगावधान ओळखून नगरसेवक अमित काळे  यांनी जमलेल्या जमावाला धीर देत तात्काळ अग्निशमन विभागाचे शशिकांत बारी यांना मोबाईलद्वारे या घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून श्री.बारी यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन विभागाचे जवान अवघ्या ६ ते ७ मिनिटांत तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पेटता टॅंकर जीवाची पर्वा न करता फायर एक्सटीगुशर व पाण्याचा मारा करून लागलीच आग आटोक्यात आणली. यामुळे मोठा अनर्थ टळला अग्निशमन विभागाच्या या तत्परतेमुळे जळगाव मनपाची मान उंचावली ही बाब अभिमानास्पद असल्याने अस्मि  फाउंडेशनच्या माध्यमातून नगरसेवक अमित काळे यांनी घटनास्थळी झालेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन थेट अग्निशमन विभागास भेट देऊन कर्तव्यावर हजर असलेले विभाग प्रमुख शशिकांत बारी तसेच सहकारी यांना शाल श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सन्मानित केले. यावेळी अमित काळे यांनी विभागाचे कौतुक करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन वेळोवेळी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे त्यांना आश्वासन दिले. यावेळी त्यांच्या समवेत फाऊंडेशनचे जुजर अमरेलीवाला, धनंजय पाटील, निरंजन महाजन, चेतन छाजेड, रोहित करमचंद, संजू निकम, राहुल माळी, गौरव ठाकूर, अविनाश खेतमाळीस आदी उपस्थित होते. याप्रसंगी अग्निशमन विभागाचे अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी, सहा.अधिकारी सुनील मोरे, वाहन चालक-प्रकाश चव्हाण, राजमल पाटील,गंगाधर कोळी,पन्नालाल सोनवणे, वाहन चालक-देविदास सुरवाडे, गिरीश खडके, नितीन बारी, तेजस जोशी,  अश्वजीत घरडे, सोपान जाधव, श्रीमती जया दुबे, अनिता माळी यांना सन्मानित करण्यात आले.

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!