अखेर पबजी मोबाईल गेमचा खेळ खल्लास

शेअर करा !

नवी दिल्ली वृत्तसंस्था l पबजी मोबाईल गेमची मालकी असणाऱ्या टेंसेंट कंपनीने आज आपण भारतातील कारभार पूर्णपणे बंद करणार असल्याची माहिती फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. यामुळे आजपासून भारतीय योजना पबजी मोबाईल आणि पबजी मोबाईल लाईट हे दोन्ही गेम खेळू शकणार नाहीत.

भारत सरकारने अलीकडेच चिनी ॲप्सवर बंदी आणण्याचा सपाटा सुरू केला आहे. चीनकडून सुरक्षितेचा धोका पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने आज पबजी मोबाईल कंपनीने पबजी मोबाईल आणि पबजी मोबाईल लाईट हे आपले दोन्ही गेम भारतीय युजर्ससाठी बंद करण्यात आल्याची घोषणा केली. यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट जारी करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की आम्ही युजर्सच्या माहितीचे संरक्षण करण्याला नेहमीच प्राधान्य देत असतो. आम्ही नेहमीच डेटा संरक्षण कायद्याच्या आणि नियमांचे पालन केले आहे. आमची पारदर्शक पद्धत प्रक्रिया आहे. मात्र अलीकडच्या काळातील घडामोडी पाहता गेम कडून आज भारतातील सेवा संपुष्टात येत असल्याचे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलेले आहे. या निर्णयामुळे आता पब्जी गेम आणि पब्जी गेम लाईट हे दोन्ही गेम युजर खेळू शकणार नाहीत. भारतामध्ये पबजी मोबाईल हे गेम अतिशय तुफान लोकप्रिय होते. मात्र आता कंपनीच्या निर्णयामुळे या सर्व योजना समोर नैराश्याचे वातावरण पसरल्याचे दिसून येत आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!