अकोला जिल्हा कारागृहातील ६८ कैद्यांना कोरोनाची लागण !

शेअर करा !

अकोला (वृत्तसंस्था) अकोला जिल्हा कारागृहातील ३०० पैकी ६८ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

store advt

 

जिल्हा कारागृहात सध्या ३०० कैदी आहेत. यातील अनेक कैदींमध्ये लक्षण नाहीत. या पॉझिटिव्ह कैद्यांसाठी तुरुंगातच आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला आहे. तसेच कैद्यांची देखभाल करण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. दरम्यान, अकोला जिल्ह्यात आतापर्यंत १४९८ कोरोना संक्रमित असून, ७६ रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. सध्या ३७८ अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे, १ हजारांपेक्षा जास्त रुग्ण ठीक झाले आहेत.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!