अंनिस कार्यकर्ता फिरोज शेख यांचे बकरी ईदनिमित्त रक्तदान

जळगाव, प्रतिनिधी ।  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा भडगावचे कार्याध्यक्ष फिरोज शेख यांनी बकरी ईद निमित्त बुधवारी २१ जुलै रोजी रक्तदान केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्यभरात त्यागाचं प्रतीक म्हणून  रक्तदान उपक्रम घेतला जातो. अंनिसच्या वतीने बकरी ईद निमित्त रक्तदान करून आपला सण साजरा करावा असे आवाहन गेल्या अनेक वर्षांपासून फिरोज शेख करीत आहे.

 

भडगाव येथील कार्यकर्ता फिरोज शेख भडगावहून रक्तदान करण्यासाठी दरवर्षी बकरी ईदच्या दिवशी येत असतो. त्याने बुधवारी जळगाव येथे इंडियन रेडक्राॅस सोसायटी येथे रक्तदान केले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डी.एस. कट्यारे उपस्थित होते.  आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता, सर्व धर्मियांनी धार्मिक सण हे अधिका अधिक समाजाभिमुख व मानवतावादी करणे हे धर्माचेच उन्नयन आहे. हाच विचार समोर ठेवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळ “बकरी ईद” निमित्त पशूची कुर्बानी देण्याच्या प्रथेमध्ये कालानुरूप बदल व्हावा व या प्रथेला पर्याय म्हणून दि.२१ जुलै २०२१ पासून “राज्यव्यापी रक्तदान सप्ताह” अभियान राबवित आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!