अंनिसतर्फे महिला पोलिसांचा सत्कार

0
14

नंदुरबार प्रतिनिधी । क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे महिला पोलीसांचा सत्कार करण्यात आला.

अंनिसतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त महिला प्रबोधन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त जिल्ह्यातील ७५ महिला पोलिसांचा अंधश्रद्धा निर्मूलन समिती व दीनानाथ एस. श्रॉफ संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलिस अधीक्षक संजय पाटील अध्यक्षस्थानी होते. मनोज श्राफ, डीवायएसपी सीताराम गायकवाड, अंनिसचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. शशांक कुलकर्णी, जिल्हा महिला कार्यवाह भारती पवार, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद सोनार, शांतिलाल शिंदे, सुकलाल शिंदे, फिरोज खान मोहंमद खान आदी उपस्थित होते. याप्रसंगी अ‍ॅड. प्रियदर्शन महाजन यांनी सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा व जादूटोणाविरोधी कायदा याविषयी माहिती दिली. यशस्वितेसाठी चंद्रमणी बर्डे, सूर्यकांत आगळे, दिलीप बैसाणे, विजय अहिरे, सोहम टिलंगे, आशा बिरारे, धनश्री शिंदे, विश्‍वजित शिंदे आदींनी प्रयत्न केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here