यावल प्रतिनिधी । तालुक्यातील अंजाळे गावातील एका कुटुंबाच्या घरात घुसून मारहाण व अश्लिल चाळे करत महिला व मुलांना मारहाण केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी तीन जणांवर यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील अंजाळे येथील सुनिल सपकाळे यांच्या घरात गावातील गावगुंड संशयीत आरोपी धिरज बाळू कोळी , गोलु बाळु कोळी आणी नितिन वसंत तायडे यांनी अनधिकृतपणे घरात घुसून घरातील कुटुंबातील सदस्यांना काहीही कारण नसतांना शिवीगाळ करून मारहाण करू लागले. तसेच घरातील महिला व लहान मुलांना जातीवाचक शिवीगाळ करण्यास सुरूवात केली आहे. हा प्रकार रविवारी १३ जून रोजी रात्री ८.३० वाजता घडला. याप्रकरणी यावल पोलीसात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
झालेल्या घटनेचा भिम आर्मीचे राज्य प्रमुख प्रफुल्ल शेंडे आणि राज्यप्रवक्ते रमाकांत तायडे यांच्यासह राज्यसचिव सुपडू संदानशिव यांनी निषेध करण्यात आला असून संशयित आरोपींची कसून चौकशी करून शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.