अंगणवाडी सेविकांना इंग्रजीत “पोषण ट्रॅकर ॲप” नको ; आयटक निषेध आंदोलन करणार

जळगाव, प्रतिनिधी । अंगणवाडी सेविकांना इंग्रजीत “पोषण ट्रॅकर ॲप” लादण्याचा धोरण विरुध्द आयटकतर्फे २३ जुलैला जिल्हा परिषद समोर निषेध करण्यात येणार आहे.

 

राज्य शासनाने मागील २ महिन्यांमध्ये अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर अँपमध्ये  माहिती अद्ययावत करण्यासाठी  इंग्रजी भाषेचाच एकमात्र पर्याय दिल्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. गेल्या महिनेपासून अंगणवाडी कर्मचारी संघटना कृती समितीने ते मराठीत करण्याबाबत मागणी केली आहे म्हणून इंग्रजी भाषेतला ॲपवर बहिष्कार टाकला आहे. पण या मागणीकडे लक्ष  देण्याऐवजी cdpo जामनेर 1 व इतर ठिकाणी अंगणवाडी सेविकांनी बहिष्कार टाकला इंग्रजीत माहिती भरली नाही  म्हणून नोटिसा बजावल्या आहेत. त्याचा निषेध!!वस्तुस्थिती अशी आहे की” इंग्रजी कळत नसलेल्या सेविकांच्या हालाला पारावर राहिलेला नाही.  शासनाने या पूर्वी अंगणवाडी सेविकांना दिलेले सर्व माहिती अँप हे मराठी भाषेत होते आणि आता अचानकपणे हे ट्रॅकर मात्र इंग्रजी भाषेतून दिले आहे ते त्यांना,वापरता येईल का? याची आधी शहानिशा करणे गरजेचे होते. कारण आपण ज्या वेळी अंगणवाडी सेविकांची भरती केली.मराठी भाषा हीच कार्यालयीन भाषा असताना इंग्रजी ट्रॅकर लादने हा मानसिक छळ आहे आणि बऱ्याचशा सेविका मानसिक तणावाखाली वावरत आहेत कारण आज कार्यरत असणाऱ्या एकूण अंगणवाडी सेविकांपैकी बहुतांशी सेविका म्हणजे,साधारण ५०  ते ६० टक्के आणि त्याही ८ वी ते १२  वी व बीए वा अपियर( कला) शिक्षित आहेत. त्यांना मराठी ॲप्स पोषण आहार माहिती भरणे सोयीचे आहे आणि महाराष्ट्रात जनतेला समजणारी मराठी भाषेवर अन्याय करून मत्रालयीन धुरिणांनी पोषण आहार ट्रॅकर निर्दयपणे  इंग्रजीत भरण्याचा हेका चालवला आहे तो चुकीचा व अन्यायकारक असल्याने निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!